Thursday, 26 July 2018

पवना बंदिस्त जल वाहिनीला विरोध कायम

  • बाळा भेगडे यांचे स्पष्टीकरण : पवना धरणात जल पूजन
पवनानगर – पवना बंदिस्त जल वाहिनीला कालही विरोध होता, आजही आहे आणि उद्याही तो कायम राहणार असल्याचे मत मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी पवना नगर येथे व्यक्‍त केले.

ऑनलाइन औषध विक्री हानीकारक

पुणे - आरोग्य क्षेत्रात होत असलेली ऑनलाइन औषध विक्री रुग्णांच्या आरोग्यास हानीकारक आहे. मान्यताप्राप्त डॉक्‍टरांमार्फत औषधे दिली आहेत का?, याची तपासणी करण्याची कोणतीही यंत्रणा ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना चुकीची औषधे दिली जाण्याचा धोका असल्याचे मत ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

पावती न दिल्याने परत करावे लागले 1 लाख 60 हजार

स्थायी लोकअदालतचा निर्णय : केवळ 3 महिन्यात दावा निकाली
पुणे – रावेत येथे सदनिका खरेदी करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाला 1 लाख 60 हजार रूपये देऊनही त्याची पावती न मिळाल्याने स्थायी लोक अदालतीकडे दाखल केलेल्या दाव्यात अर्जदाराला 1 लाख 60 हजार रुपयांची रक्‍कम परत मिळाली आहे. हा दावा 3 महिन्यात निकाली काढण्यात यश आले. या दाव्यात अर्जदाराने स्वत: आपली बाजू मांडली. स्थायी लोकअदालतचे अध्यक्ष, माजी जिल्हा न्यायाधीश सुधीर काळे, सदस्य रविकुमार बीडकर, प्रमोद बनसोडे यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.

खराब बसेस तंदुरुस्त करून द्या

पीएमपीच्या ठेकेदारांना सूचना

पुणे – वारजे येथील अपघातानंतर पीएमपीच्या ताफ्यातील ठेकेदारांकडून चालवण्यात येणाऱ्या बसेसची तपासणी करण्यात आली. वीस दिवसांच्या तपासणीनंतर अनेक बसेस नादुरुस्त असून छोट्या मोठ्या 12 प्रकारच्या समस्या असल्याचे समोर आले होते. यानुसार संबंधीत बसेस वाहतुकीसाठी तंदुरुस्त नसल्याचे सांगत पुढील 10 दिवसांत त्या दुरुस्त करून देण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. पीएमपी अधिकाऱ्यांसोबत बुधवारी झालेल्या बैठकीत अशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत

परिवहन समितीची माहिती 15 दिवसांत “अपडेट’ करा

जिल्हा सुरक्षा समिती अध्यक्षांची सर्व शाळांना सूचना

पुणे – शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत परिवहन समिती असणे आणि विशिष्ट कालावधीत त्यांची बैठक घेणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश शाळा याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येक शाळेने परिवहन समिती, त्यांच्या झालेल्या बैठका, अध्यक्ष, सदस्यांची नावांबाबतची सविस्तर माहिती भरण्यासाठी पुणे आरटीओने www.schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर शहर, जिल्ह्यातील सर्व शाळांनी 15 दिवसांत माहिती अद्ययावत करण्याचे आदेश जिल्हा सुरक्षितता समितीच्या अध्यक्षांनी दिले आहेत.

प्लॅस्टिकबंदीचा महिनाभरातच फुसका बार

पुणे – पर्यावरण रक्षणासाठी राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी लागू केली. याच्या काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी व्यावसायिक आणि प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा घेण्यात आला. पण, “नव्याचे नऊ दिवस’ याप्रमाणे दिखाऊ कारवाई झालीसुद्धा. मात्र, निर्णयाला महिना होण्याआधीच प्लॅस्टिक वापरावर कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. यातूनच प्लॅस्टिक विक्रेत्यांचे उखळ पांढरे झाले असून कॅरिबॅगही भाव खाऊन जात आहे. त्यामुळे प्रभावी कारवाई होण्याची आवश्‍यकता आहे, नाहीतर प्लॅस्टिकबंदी निरर्थक होणार आहे.

Wednesday, 25 July 2018

निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर आज बस चाचणी

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या बहुचर्चित बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये आज (बुधवारी) बसची चाचणी घेतली जाणार आहे. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही चाचणी होणार आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच दरम्यान ही चाचणी घेतली जाणार आहे. यावेळी याचिकाकर्ता, पीएमपीएमएल व पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर आज बस चाचणी