पुणे – पर्यावरण रक्षणासाठी राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी लागू केली. याच्या काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी व्यावसायिक आणि प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा घेण्यात आला. पण, “नव्याचे नऊ दिवस’ याप्रमाणे दिखाऊ कारवाई झालीसुद्धा. मात्र, निर्णयाला महिना होण्याआधीच प्लॅस्टिक वापरावर कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. यातूनच प्लॅस्टिक विक्रेत्यांचे उखळ पांढरे झाले असून कॅरिबॅगही भाव खाऊन जात आहे. त्यामुळे प्रभावी कारवाई होण्याची आवश्यकता आहे, नाहीतर प्लॅस्टिकबंदी निरर्थक होणार आहे.
No comments:
Post a Comment