Sunday, 29 July 2018

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

पिंपरी (Pclive7.com):- नव्याने सुरू होत असलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.२७) काढलेल्या आदेशान्वये भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील राज्यातील ९५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन तडफदार पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शंकर आवताडे यांनी स्विकारला चिखली पोलिस स्टेशनचा पदभार

चौफेर न्यूज – चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी या परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने गुरुवारी (दि. 26) दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून शंकर आवताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शंकर आवताडे चिखली पोलीस ठाण्याचे पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. चिखली पोलीस ठाण्यात निगडी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग देण्यात येणार असून या दोन पोलीस ठाण्यांमधून आणि पोलीस मुख्यालयाकडून फौजफाट्याची गरज भागवली जाणार आहे. शासकीय पातळीवर पोलीस ठाण्यास मान्यता मिळाली असून चिखली येथील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत हे नवीन पोलीस ठाणे सुरू होण्याची शक्‍यता आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

चऱ्होली साई मंदिरात माध्यान्ह आरतीला भाविकांची गर्दी

चौफेर न्यूज –  गुरूपौर्णिमेनिमित्त पुणे-आंळदी रस्त्यावरील च-होली येथील श्री साई मंदिरात श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे व विश्वस्त शिवकुमार नेलगे यांच्या हस्ते (शुक्रवारी दि. 27 जुलै) दुपारी 12 वाजता भक्तीपुर्ण वातावरणात श्रींची माध्यान्ह आरती करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार दौंडकर आणि हजारो भक्त भाविक उपस्थित होते.

वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नवीन दुचाकी!

वाहतूक पोलिसांकडे दाखल; महत्त्वाच्या व्यक्ती, मोर्चा बंदोबस्तासाठी उपयुक्त

पुणे : वाहतूककोंडी झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसांची गाडी पोहोचू शकत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीतील बदलांची माहिती देण्यासाठी ध्वनिवर्धक, भोंगा, वाहतूक नियंत्रण करण्यासाठीचे एलईडी बॅटन अशा सुविधा असलेल्या पाच दुचाकी वाहतूक पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच राजकीय नेत्यांच्या बंदोबस्तासाठी लागणाऱ्या ताफ्यातदेखील या दुचाकींचा समावेश केला जाणार आहे.

धर्मादाय आयुक्तांचा संस्था, ट्रस्ट नोंदणी प्रस्ताव फक्त ऑनलाईन स्विकारणाचा आदेश रद्द

उच्च न्यायालयाचा निर्णय
पूर्वीप्रमाणेच प्रस्ताव फाईल स्वरूपात स्विकारावेत
वकिलांच्या लढ्याला यश

आरटीईनुसार राखीव जागांची आता संकेतस्थळावर माहिती

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागा असणाऱ्या सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी आता शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षात आरटीईच्या पोर्टलवरदेखील या यादीची लिंक असेल. शैक्षणिक वर्ष 2019-20पासून ऑनलाइन प्रणालीत हे बदल करण्यात येणार आहेत. 

Saturday, 28 July 2018

पक्ष्यांनी फिरवली पाठ

उद्योगनगरीत १४८ पैकी २०-२५ प्रकारचेच पक्षी उरले