पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागा असणाऱ्या सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी आता शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षात आरटीईच्या पोर्टलवरदेखील या यादीची लिंक असेल. शैक्षणिक वर्ष 2019-20पासून ऑनलाइन प्रणालीत हे बदल करण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment