पिंपरी - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि महासाधू मोरया गोसावी यांची पालखी रथात आणलेली मूर्ती यांची बुधवारी (ता. ८) चिंचवडगाव येथे प्रतिकात्मक भेट झाली. हा सोहळा भाविकांनी ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात यंदा प्रथमच चिंचवडमार्गे जात असल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये वेगळाच उत्साह पाहण्यास मिळाला.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 9 August 2018
नाट्यछटा स्पर्धेची रविवारी अंतिम फेरी
निगडी – नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील 93 नाट्यछटा अंतिम फेरीत पोहचल्या आहेत. पिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धेची प्राथमिक फेरी 4 केंद्रांवर पार पडली. प्राथमिक फेरीत 500 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरी रविवारी (दि.12) निगडी-प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनीच्या नवनगर विद्यालय येथे होणार आहे.

पिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई
चौफेर न्यूज – पिंपळे सौदागर येथील स्मशान भूमीमागील पत्राशेड मध्ये खुलेआम पैसे लावून सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने छापा मारला. यावेळी जुगार खेळणाऱ्या तेरा जणांवर कारवाई करुन ४५ हजार २०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नोंदणीकृत कामगारांना पाच लाख रुपये अपघात विमा द्या !
महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांची कामगार मंत्र्यांकडे मागणी, मंडळाचे कार्यालय सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी
पिंपरी चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयडॉल!!
पिंपरी चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक वर्ष ५ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस मागील ४ वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक ०३ जुलै २०१८ रोजी नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, नवी सांगवी येथे सायं ५.३० वा संपन्न झाली.अंतिम फेरी मध्ये सर्व ११ स्पर्धकांचे तीन फेऱ्या घेण्यात आल्या पहिल्या फेरी मध्ये शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीते, दुसऱ्या फेरी मध्ये द्वंद्वगीते व तिसऱ्या फेरी मध्ये कव्वाली/मुजरा गीते सादर करण्यात आली.सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्तम व दर्जेदार गीते सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
In month of ‘Swachh Kranti’, state pushes for segregation at source, proper processing of garbage in urban areas
After declaring its urban areas open defecation free (ODF) with much fanfare on October 1 last year, the state government has now put the segregation and processing of waste on the top of its priority list, and designated August as ‘Swachh August Kranti’ for the purpose.


मागासवर्गीयांचा परदेशातील शैक्षणिक खर्च ‘सामाजिक न्याय’ करेल
मंत्री दिलीप कांबळे यांची घोषणा
पिंपरी-चिंचवड : मागासवर्गीय समाजातील बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांचा तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा देशातील तसेच परदेशातील शैक्षणिक खर्च सामाजिक न्याय विभाग करेल. तसेच, शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
Subscribe to:
Posts (Atom)