पिंपरी - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि महासाधू मोरया गोसावी यांची पालखी रथात आणलेली मूर्ती यांची बुधवारी (ता. ८) चिंचवडगाव येथे प्रतिकात्मक भेट झाली. हा सोहळा भाविकांनी ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात यंदा प्रथमच चिंचवडमार्गे जात असल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये वेगळाच उत्साह पाहण्यास मिळाला.

No comments:
Post a Comment