पिंपरी-चिंचवड : महापालिकेमार्फत राबविल्या जाणार्या बोर्हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेच्या फेरसादर केलेल्या 112 कोटी रुपयांच्या निविदेला अखेर स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. हे काम ठेकेदार एस. जे. कॉन्ट्रॅक्टस यांना देण्यात येणार आहे. दरम्यान, कामाचे स्वरुप बदलल्याने डीपीआर किमतीत मोठा फेरबदल झाला आहे. त्यासाठी या गृह प्रकल्पाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) नोडल एजन्सी असलेल्या म्हाडाकडे सादर करण्यात येणार असून राज्य व केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. दरम्यान, विद्यमान स्थायी समिती अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच 116 कोटींच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 10 August 2018
रावेत, किवळेतील अनधिकृत बांधकांवर हातोडा
रावेत- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत व अ तिक्रमण विभागाने रावेत, किवळे येथील अनधिकृ त बांधकावर हातोडा चालविला. मंगळवारी के लेल्या कारवाईत एकूण तीन बांधकामे पाडण्यात आली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 येथील रावेत व किवळे अनधिकृत बांधकामे झाली होती. या अनधिकृत बांधकामांवर पालिके च्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. कारवाईमध्ये आरसीसी एक व पत्राशेड दोन असे एकुण तीन बांधकामावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.
अण्णासाहेब मगर स्टेडियमचे अद्ययावत सुविधांसह नुतनीकरण करण्यात यावे
पिंपरी- औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी- चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ओळख व्हावी. विविध खेळांमध्ये स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी. यासाठी महापालिकेतर्फे नेहरुनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियमची उभारणी करण्यात आली. तथापि, पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या स्टे डियमची अवस्था भयावह झाली असून खेळाडूंना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने अद्यावत सुविधांसह स्टेडियमचे नुतनीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यक र्ते कुणाल जगनाडे यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
म. बसवेश्वर चौकात पादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावे-नगरसेविका मीनल यादव
चिंचवड- येथील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या चौकात पादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत बीआरटी विभागाचे उपअभियंता विजय भोजने यांना नगरसे विका मीनल यादव यांनी निवेदन दिले.
संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा
पिंपरी-चिंचवड : नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने श्री संत नामेदव महाराज यांच्या 668 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि.10)विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष मोहन मुळे यांनी दिली. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील मंदिरात शुक्रवारी सकाळपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री नामदेव महाराज यांच्या मुर्तींना सकाळी आठ ते नऊ या वेळेत अध्यक्षांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे.
115 कोटीच्या विकास कामांना मंजुरी
पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 115 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिका क्षेत्रातील बोर्हाडेवाडी येथे 1288 निवासी सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणार असून त्यासाठी 112 कोटी 18 लाख, भोसरी स.नं.एक मधील दवाखाना इमारतीसाठी बैठक व्यवस्था करणे व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 73 लाख 38 हजार, महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांचे नेटवर्किंगचे दुरुस्ती व देखभाल कामकाजासाठी एक कोटी 38 लाख 90 हजार या खर्चाचा समावेश आहे.
वीज दरवाढीच्या प्रस्तावाला ग्राहकांचा कडाडून विरोध
पुणे - स्थिर आकारामध्ये सुमारे शंभर ते अडीचशे टक्के सुचवलेली दरवाढ ही सामान्य ग्राहकांवर अन्यायकारक असून, शेतीपंप वीजवापराबाबत आयआयटी मुंबई आणि सत्यशोधन समितीचा अहवाल आयोगासमोर मांडण्यात यावा, अशी मागणी करीत विविध संस्था आणि संघटनांनी महावितरणच्या दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध कडाडून केला. तर, महसुली तूट आणि विविध आर्थिक सूट द्यावी लागत असल्याने दरवाढ करावी लागणार असल्याचे सांगत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी समर्थन केले.
Subscribe to:
Posts (Atom)