Tuesday, 14 August 2018

पालिकेच्या व्यायामशाळेत पोलीस आयुक्‍तालयाचा नियंत्रण कक्ष

पिंपरी – महापालिकेच्या व्यायामशाळेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा नियंत्रण कक्ष सुरु होणार असून येथूनच 15 ऑगस्टपासून खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरूवात होणार आहे. यासाठी वायरलेस यंत्रणा बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दापोडीत बसविणार गर्डर लाँचर

पिंपरी - दापोडीत मेट्रो व्हायाडक्‍टच्या दोन स्पॅनवर गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, त्याच्या आधारे व्हायाडक्‍टचे काम वेगाने सुरू होईल. नाशिक फाटा येथील मेट्रो स्थानकाच्या प्रारंभिक कामालाही सुरवात झाली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पिंपरी स्थानकावर सरकता जिना

जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडतात
निगडी : वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्यासाठी बहुतांश प्रवासी पायर्‍यांचा जिना चढण्यास नापसंद करतात. जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडला जातो. यासाठी पिंपरी रेल्वे प्रशासनाने सरकता जिना बसविण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या काही दिवसात हा जिना प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पिंपरी रेल्वे स्थानकावर दोन जिने आहेत. परंतु या जिन्यांचा वापर अगदी मोजकेच प्रवासी करतात. बहुतांश प्रवासी जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडून जाणे पसंत करतात. यामुळे वेळ वाचतो आणि जास्त श्रमही करावे लागत नाही. परंतु अशा शॉर्टकटच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडणार्‍या कित्येक प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. तरी देखील ही परिस्थिती बदलत नाही.

पिंपरी पालिकेसमोर वाहनचालक वैतागले

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर मेट्रो कॉर्पोरेशनच्या वतीने नुकतेच काम सुरू करण्यात आले आहे. मोरवाडी चौक ते खराळवाडीपर्यंतचा सर्व्हिस रस्ता अरूंद झाला असून वाहतुक संथ होत आहे. त्यामुळे वाहनचालक वैतागले आहेत.

नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; आमदार महेश लांडगे यांचे अधिका-यांना निर्देश

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे शहरातून वाहणा-या नदीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहून नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे आदेश आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिले आहेत. तसेच पाण्याचे नियोजन वेळेत करावे. पाणी गळती रोखण्यासाठी चिखली ते च-होली परिसरातील सर्व ठिकाणची गळती तपासून घेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सल्लागार सदस्यपदी खासदार साबळे

केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी राज्यसभा खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र पाहिजे – बाबा कांबळे

प्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर पाणपोई, वाचनालय, फोनबुकिंग केंद्र, सेवा केंद्र अशा सुविधा द्याव्यात तसेच रिक्षा स्टॅन्डवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली प्रवासी सेवा द्यावी, अशा प्रकारे चांगली सेवा आणि इतर अन्य सुविधा देऊन पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र झाले पाहिजे यासाठी रिक्षा चालकांनी प्रयत्न करावेत असे आव्हान महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांना केले.