जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडतात
निगडी : वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्यासाठी बहुतांश प्रवासी पायर्यांचा जिना चढण्यास नापसंद करतात. जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडला जातो. यासाठी पिंपरी रेल्वे प्रशासनाने सरकता जिना बसविण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या काही दिवसात हा जिना प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पिंपरी रेल्वे स्थानकावर दोन जिने आहेत. परंतु या जिन्यांचा वापर अगदी मोजकेच प्रवासी करतात. बहुतांश प्रवासी जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडून जाणे पसंत करतात. यामुळे वेळ वाचतो आणि जास्त श्रमही करावे लागत नाही. परंतु अशा शॉर्टकटच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडणार्या कित्येक प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. तरी देखील ही परिस्थिती बदलत नाही.
No comments:
Post a Comment