Saturday, 1 September 2018

टोमॅटोचा “चिखल’

पिंपरी – टोमॅटो दहाला दोन किलो…घ्या हो भाऊ…घ्या हो ताई…अशी आरोळी ठोकून विक्रेत्यांच्या घशाला कोरड पडली आहे. पाच रुपये किलो दराने विक्री होवूनही टोमॅटोची विक्रमी आवक वाढल्याने टोमॅटो कचरा कुंडीत फेकून देण्याची वेळ पिंपरीतील फळभाजी विक्रेत्यांवर आली आहे.

‘हॉकर्स झोन’चा प्रश्‍न मार्गी लावा!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड मधील अतिक्रमणांवरून शहरातील फेरीवाले धास्तावले आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने फेरीवाल्यांविरुद्धच्या कारवाईसाठी आरोप, प्रत्यारोप करणाऱ्या खासदार, आमदारांनी “हॉकर्स झोन’साठी एकत्र यावे, अशी मागणी फेरीवाला महासंघाकडून करण्यात आली आहे.

“वायसीएम’ प्रशासनाचा निषेध

पिंपरी – महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना योग्य रुग्णालयीन सुविधा मिळत नाहीत. महापालिका आणि रुग्णालय प्रशासन रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी कमी पडत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड शहर भारिप बहुजन महासंघच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

अतिक्रमणमुक्‍त महामार्गांसाठी जादा कुमक

पुणे – “ग्रामीण भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. महामार्गांवरील चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगावसह सर्वच प्रमुख ठाण्यांत किमान 50 पोलीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग अतिक्रमणमुक्‍त करण्यावर भर देणार,’ अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

पोलीस स्टेशनमध्ये धिंगाना घालणाऱ्या तरूणींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

चौफेर न्यूज  दारू पिऊन मध्यरात्री भर रस्त्यावर पोलीसांशी हुज्जत घालून पोलीस स्टेशनमध्ये धिंगाना घालणा-या तरूणींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मोरवाडी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून हा प्रकार गुरुवारी (दि. ३०) मध्यरात्री एक वाजता वाल्हेकरवाडी मधील आहेर गार्डनच्या बाहेर घडला. त्यावरून एक तरुण आणि दोन तरुणी असे तिघांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

‘सागरमाथा’ने केली माउंट मेन्टोक ‘कांगरी’वर यशस्वी चढाई

भोसरी : भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने लेह-लडाख परिसरातील माउंट मेन्टोक कांगरी हे 6250 मीटर उंचीचे शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले. एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत पवार, संदीप तापकीर, सुमित दाभाडे, संग्राम बुर्डे, श्रीकांत जाधव, पांडुरंग शिंदे, श्रीधर घाडगे, निकेश रासकर व संकेत घुले या दहा सदस्यांनी ही मोहीम यशस्वी केली. संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त ही मोहीम आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष प्रवीण हरपळे यांनी दिली. पुणे येथून 12 ऑगस्ट रोजी मोहिमेस सुरवात झाली. पुणे-दिल्ली-मनालीमार्गे सर्व सदस्य 15 ऑगस्ट रोजी लेह येथे पोहोचले. स्वातंत्र्यदिनी मनाली-लेह या मार्गातील अतिउंचवरील रोहतांग पास (13060 फुट), बारलाचा पास (16500 फुट), नकिला पास (15547), लाचुंगला पास (16616 फुट) आणि तांगलांगला पास (17480 फुट) या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवून करून 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

Friday, 31 August 2018

जनकल्याण समितीच्या वतीने शनिवारी पिंपळेगुरवमध्ये सन्मान स्त्री-शक्ती कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यासाठी शनिवारी (दि. १ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात सन्मान स्त्री-शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा अमृता फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
जनकल्याण समितीच्या वतीने शनिवारी पिंपळेगुरवमध्ये सन्मान स्त्री-शक्ती कार्यक्रमाचे आयोजन