Saturday, 1 September 2018

‘सागरमाथा’ने केली माउंट मेन्टोक ‘कांगरी’वर यशस्वी चढाई

भोसरी : भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने लेह-लडाख परिसरातील माउंट मेन्टोक कांगरी हे 6250 मीटर उंचीचे शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले. एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत पवार, संदीप तापकीर, सुमित दाभाडे, संग्राम बुर्डे, श्रीकांत जाधव, पांडुरंग शिंदे, श्रीधर घाडगे, निकेश रासकर व संकेत घुले या दहा सदस्यांनी ही मोहीम यशस्वी केली. संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त ही मोहीम आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष प्रवीण हरपळे यांनी दिली. पुणे येथून 12 ऑगस्ट रोजी मोहिमेस सुरवात झाली. पुणे-दिल्ली-मनालीमार्गे सर्व सदस्य 15 ऑगस्ट रोजी लेह येथे पोहोचले. स्वातंत्र्यदिनी मनाली-लेह या मार्गातील अतिउंचवरील रोहतांग पास (13060 फुट), बारलाचा पास (16500 फुट), नकिला पास (15547), लाचुंगला पास (16616 फुट) आणि तांगलांगला पास (17480 फुट) या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवून करून 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment