Wednesday, 5 September 2018

बाहेरचा कचरा टाकला जातोय महापालिका हद्दीत

पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हिंजवडी व परिसरातील कचरा महापालिका हद्दीमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टाकताना भाजपाचे नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांनी रविवारी (दि.2) रंगेहाथ पकडल्याने खळबळ माजली आहे. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरातील कचरा कुंड्या रात्रीच्या वेळी कचर्‍याने पूर्ण भरल्याचे लक्षात आल्यानंतर हा कचरा कोण टाकत आहे याबाबत शिंदे यांनी गस्त सुरू केली होती. त्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहेे.

बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-बेंगलोर महामार्गावरील खड्ड्यांचा दिवसा पाहणी दौरा करावा – नाना काटे

पिंपरी (Pclive7.com):- मुंबई-बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला जाताना राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवसा प्रवास करुन स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी महामार्गावरील असे अनेक खड्डे पहावेत असे वक्तव्य पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवक नाना काटे यांनी केले आहे.

शिक्षक दिनाचा सत्ताधारी भाजपला पडला विसर – विरोधी पक्षनेते दत्ता साने

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिक्षण विभागातील अधिका-यांना सलग दुस-यावर्षी शिक्षक दिनाचा विसर पडला आहे. उद्या शिक्षक दिन असून पालिकेने कोणतेही नियोजन केले नाही. शाळांना शिक्षकदिन साजरा करण्याबाबत कोणत्याही सूचना केल्या नाहीत. उद्या ५ सप्टेंबर शिक्षक दिन असल्याबाबत शिक्षणाधिकारी अनभिज्ञ आहेत. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडला असल्याचा, आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला.

#शिक्षकदिन : आदर्श पुरस्कार मिळणार कधी?

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या शिक्षक विभागाने अद्याप आदर्श शिक्षक व आदर्श शाळांची यादी जाहीर केली नाही. सलग दोन वर्षांपासून प्रशासनाच्या अनियोजनबद्ध कारभारामुळे शिक्षकदिनी पुरस्कार मिळत नसल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. 

#शिक्षकदिन : पवित्र प्रणालीतून १९३ शिक्षक

पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये अडीचशे शिक्षकांची कमतरता असून, त्यापैकी १९३ शिक्षक सेवक राज्य सरकारच्या पवित्र प्रणालीच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे वीस टक्के शिक्षक कमी असल्याने शिक्षणावर परिणाम होत असून उर्दू, हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक संख्या मान्यतेच्या तुलनेत खूपच कमी आहे. 

कॉलेजात मिळणार शिकाऊ वाहन चालक परवाना

महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबरोबरच गाडी घेण्याचा विद्यार्थ्यांचा हट्ट असतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच शिकाऊ चालक परवाना (लर्निंग लायसन्स) मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती करण्यासाठी समुपदेशन व शिकाऊ चालक परवाने देण्यास महाविद्यालयांनी सुरुवात करावी, असे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढले आहे.

प्रत्येक फ्लेक्सवर ‘पिंपरी विधानसभेत परिवर्तन नक्की बरं का

पिंपरी: नगरसेवक शैलेश मोरे यांनी 2012 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडून लढविली होती. केवळ काही मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कालांतराने आझम पानसरे यांनी भाजप प्रवेश केला. त्याप्रमाणे शैलेश मोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले. पिंपरी विधानसभेमध्ये  राष्ट्रवादीचे आमदार झाले, शिवसेनेचे आमदार आहेत. तरीही पिंपरी विधानसभा मतदार संघात विकासकामांची बोंब आहे. कुठल्याही कामाचे नियोजन नाही. एम्पायर इस्टेटमधील रॅम्पचा विषय आहे. या विषयाला स्थानिक आमदारांनी लक्ष दिले नाही. असे बरेच प्रलंबित प्रश्‍न आहेत. ते मार्गी का लागत नाही, याचे उत्तर नागरिकांना कोण देणार? चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाच्या मानाने पिंपरी विधानभा मतदार संघ दुर्लक्षित आहे.