पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हिंजवडी व परिसरातील कचरा महापालिका हद्दीमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टाकताना भाजपाचे नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांनी रविवारी (दि.2) रंगेहाथ पकडल्याने खळबळ माजली आहे. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरातील कचरा कुंड्या रात्रीच्या वेळी कचर्याने पूर्ण भरल्याचे लक्षात आल्यानंतर हा कचरा कोण टाकत आहे याबाबत शिंदे यांनी गस्त सुरू केली होती. त्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहेे.

No comments:
Post a Comment