Friday, 7 September 2018

मोरे नाटय़गृह कधी सुरू होणार?

चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचे नूतनीकरण चार महिन्यांत पूर्ण करायचे आहे, असे सांगून महापालिकेने नाटय़गृह बंद ठेवले. तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या या नूतनीकरणाचे काम चार महिन्यांनंतरही रडतखडत सुरू आहे. नाटय़गृह कधी सुरू होणार, या विषयी कोणाकडेच खात्रीशीर माहिती नाही. त्यामुळे पालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराविषयी सांस्कृतिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गणेशोत्सव मंडळाच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

पुणे : गणेशोत्सव मंडळांना धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी नसणार्‍या मंडळावर कारवाई होऊ शकते. ती टाळण्यासाठी गणेश मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्तालयाने केले आहे. हे काम एका दिवसात होण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केल्याचे आयुक्तालयाने सांगितले आहे. दरम्यान, अनधिकृत पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शहरात वाहतुकीचे तीन तेरा

पिंपरी-चिंचवड : शहरामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कोणी कुठूनही वाहने चालवताना, तसेच रस्त्याचा मधोमध वाहने थांबवून गप्पा मारताना आढळून येत आहेत. पीएमपीएमएल बस थांब्याच्या समोर चक्क रिक्षा स्टॉप सजवून रिक्षा चालक प्रवासी नागरिकांची चांगलीच गोची करत आहेत. त्यामुळे प्रवासी नागरिकांना भर रस्त्रावर बसची वाट पाहावी लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र शहरातील बहुतांश चौकांमध्ये पाहायला मिळते.

एकेरी वाहतुकीला ‘ग्रहण’

पिंपरी - हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एकेरी वाहतुकीचा उपक्रम पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. मात्र, पीएमपी बसचा विस्कळितपणा, बसथांबे, बेशिस्त पार्किंग व वाहतूक, रस्ता नसल्याने घुसखोरी करणारे स्थानिक, रस्त्यावर पडलेली खडी, अशा समस्यांच्या गर्तेत हिंजवडीतील एकेरी वाहतूक अडकली आहे. 

वाहतूक हेच आव्हान - आर. के. पद्‌मनाभन

पिंपरी - ‘‘शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणणे कठीण नाही. मात्र, वाहतूक समस्या सोडवणे हे आव्हानात्मक असून, त्यावर सध्या लक्ष केंद्रित करीत आहोत,’’ असे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी गुरुवारी (ता. ६) सांगितले. ‘सकाळ’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मोबाईल रेल्वे तिकीट होतेय लोकप्रिय!

पुणे - पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलचे तिकीट मोबाईलवरून घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. एका महिन्यातच सुमारे एक लाख प्रवाशांनी मोबाईलवरून तिकीट घेतले आहे. 

शिक्षण सभापतींच्या दिमतीला नवी मोटार

पिंपरी – महापालिका शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांच्या दिमतीला नवी कोरी मोटार खरेदी केली जाणार आहे. याशिवाय फ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या अभियंत्याला देखील नवीन मोटार मिळणार आहे.