पिंपरी-चिंचवड : शहरामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कोणी कुठूनही वाहने चालवताना, तसेच रस्त्याचा मधोमध वाहने थांबवून गप्पा मारताना आढळून येत आहेत. पीएमपीएमएल बस थांब्याच्या समोर चक्क रिक्षा स्टॉप सजवून रिक्षा चालक प्रवासी नागरिकांची चांगलीच गोची करत आहेत. त्यामुळे प्रवासी नागरिकांना भर रस्त्रावर बसची वाट पाहावी लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र शहरातील बहुतांश चौकांमध्ये पाहायला मिळते.
No comments:
Post a Comment