पिंपरी - ""कैलासवासी थोरल्या महाराज साहेबांनी न्यायनिवाडे केले. त्याप्रमाणे गोतसभा बोलावून न्यायनिवाडे करावेत,'' अशा आदेशाचा उल्लेख असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडातील "महजर'पासून पेशवेकालीन, आदिलशाही, इंग्रज-मराठे यांच्या काळातील जवळपास साडेतीनशेहून अधिक ऐतिहासिक पत्रव्यवहार इतिहास संशोधक ब. हि. चिंचवडे यांनी जतन केले आहेत. इतिहासाच्या शेकडो वर्षांपूर्वीच्या या साक्षीदारांची खरी ओळख ते नव्या पिढीलादेखील घडवत आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 17 October 2018
उद्यान अधीक्षक साळुंकेंची महापौरांकडून कानउघाडणी
पिंपरी, दि.16 (प्रतिनिधी)- महिला नगरसेवकांशी फोनवर उद्धटपणे बोलणारे महापालिकेचे उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांची महापौर राहूल जाधव यांनी कानउघाडणी केली. पुन्हा असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही, आता निघा अशा शब्दांत तंबी दिली. नगरसेविका कमल घोलप यांच्या तक्रारीवरून साळुंके यांना चांगलेच सुनावले.
पोलीस-महापालिका प्रशासनाची आज संयुक्त बैठक
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी सोमवारी(दि.15) आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. वेळ नसल्याचे पत्र पोलीस आयुक्तांनी थेट महापौरांना पाठविलेआहे. वेळेचे नियोजन करून बैठक घेऊ असेही त्या पत्रात म्हटले आहे. आता ही बैठक बुधवारी (दि.17) आयोजित करण्यात आली आहे.
शहरावर घोंघावतेय पाणी कपातीचे संकट
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले असतानादेखील जलसंपदा विभागाने पाणीकपात करण्याविषयीची माहिती महापालिका प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. त्यावरून पाणी कपात करण्याचे धोरण तयार केले आहे. याबाबतचा धोरणात्मक निर्णय आगामी दोन दिवसांत घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी कपातीला समोर जावे लागण्याची दाट शक्यता आहे. मात्र. या कपातीला सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे.
चाकण बसस्थानक झाले पार्किंग “हब’
चाकण- येथील एसटी बसस्थानक म्हणजे अनधिकृत वाहनाचे अधिकृत वाहनतळ झाले आहे. अनेक बेकायदेशीर वाहनांच्या पार्किंगमुळे तसेच स्थानकाच्या आवारातील व्यवसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे बसस्थानकाच्या आवारात एक-दोन स्थानिक वाहतूक करणाऱ्या एसटी बस वगळता दुसऱ्या एसटी बस दिसत नाहीत. खासगी वाहनांच्या अतिक्रमणामुळे हे वाहनतळ आहे की बसस्थानक अशी शंका येऊ लागली आहे.
कौमार्य चाचणी केली नाही; दांडियासाठी “बहिष्कार’
पिंपरी – अमेरिकेमध्ये नुकत्याच एका भारतीय युवा शास्त्रज्ञाला केवळ त्याचे आडनाव हिंदू वाटत नाही म्हणून तेथील एका हिंदू मंदिरातील दांडीया उत्सवात भाग घेण्यास नाकारले होते. या गोष्टीची चीड त्याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन व्यक्त केली. असाच प्रकार पिंपरी येथेही घडला असून केवळ ल्गानपूर्वी कौमार्य चाचणी केली नाही म्हणून विवोहितेला दांडीया खेळण्यास मज्जाव करत तिच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. याप्रकरणी विवोहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत आठ जणांविरोधात मंगळवारी (दि.16) गुन्हा दाखल केला आहे.
Tuesday, 16 October 2018
वाहन परवाना नसणारे शेकडो कर्मचारी चालवितात बस
पीएमपीएल डेपोमध्ये बस दुरुस्तीचे काम करणार्या तब्बल 976 कर्मचार्यांकडे वाहन चालविण्याचा परवानाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वाहन चालविण्याचे तंत्र माहिती नसताना आणि परवाना नसताना हे कर्मचारी सर्रास बस चालवित असल्याने प्रशासन अपघात होण्याची प्रतिक्षा करीत आहे का, हा सवाल उपस्थित होत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)