Wednesday 17 October 2018

उद्यान अधीक्षक साळुंकेंची महापौरांकडून कानउघाडणी

पिंपरी, दि.16 (प्रतिनिधी)- महिला नगरसेवकांशी फोनवर उद्धटपणे बोलणारे महापालिकेचे उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांची महापौर राहूल जाधव यांनी कानउघाडणी केली. पुन्हा असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही, आता निघा अशा शब्दांत तंबी दिली. नगरसेविका कमल घोलप यांच्या तक्रारीवरून साळुंके यांना चांगलेच सुनावले.

No comments:

Post a Comment