एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी योजनेतील शहरांमध्ये देशात पिंपरी-चिंचवड 41 व्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात शहराचा तिस-या टप्प्यात समावेश झाल्यानंतरही शहराचा 41 वा क्रमांक आहे. ही चांगली बाब असून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्यानंतर क्रमांकामध्ये आणखी सुधारणा होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 28 December 2018
अबब…शहरात 72 हजार मोकाट श्वान !
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या श्वानांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या वारंवार घटना घडत आहेत. शहरात तब्बल 72 हजार मोकाट श्वान आहेत. यावर्षी 14 हजार 907 श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
महापालिका 6 महिन्यात ‘ई-गव्हर्नंन्स’च्या दुस-या टप्प्याला सुरुवात करणार
एमपीसी न्यूज – सामाजिक मूल्य जोपासत प्रशासकीय कामकाज करीत असताना, नागरिकांना उत्तम आणि तत्पर सेवा देणे म्हणजेच सुशासन आहे. ई गव्हर्नंन्सच्या माध्यमातून सुशासनापर्यंत अधिक पोहोचता येणे शक्य असून पिंपरी चिंचवड महापालिका पुढील 6 महिन्यांच्या काळात ई-गव्हर्नंन्सच्या दुस-या टप्प्याला सुरुवात करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
Pimpri : कचरा गोळा करण्यासाठी महापालिका आकारणार दरमहा शुल्क; ‘असे’ आकारले जाणार शुल्क
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 90 ते 120 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास दंड केला जाणार आहे. कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
महापालिकेची धूर फवारणी पद्धत बंद करावी
पिंपरी : शहरामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत की, जेथे डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात रोज होत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी महापालिका स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेनुसार परिसरात धूर फवारणी करीत असते. मात्र एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने केलेल्या पाहणीनुसार अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ही धूर फवारणी होय. धूर फवारणी करताना नजरेस आलेल्या गोष्टी इसिए टीम सदस्यांनी महापालिका वैद्यकीय संचालक डॉ.पवन साळवी यांच्याशी चर्चा केली. धूर फवारणी ऐवजी कीटक नाशकांची औषध फवारणी करावी, असा उपाय यावेळी महापालिका अधिकार्यांना सूचविण्यात आले.
घरकूल वाटप न केल्याने सहाय्यक आयुक्तांना सक्त ताकीद
पिंपरी : महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन प्रकल्पाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी अजंठानगर, मिलिंदनगर प्रकल्पातील घरकुलाचे वाटप अद्याप केलेले नाही, तसेच वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पाबाबत तक्रारी प्रचंड वाढल्याने सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
वरिष्ठ अधिकार्यांना अतिरिक्त पदभार देवू नका
पिंपरी चिंचवड : अतिरिक्त पदभारामुळे अनेक अधिकार्यांना एकाही विभागाचे सुरळीत कामकाज करणे कठीण झाले आहे. त्यांना नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यास वेळ देखील मिळेना झाला आहे. महानगरपालिका आस्थापनेच्या वर्ग 1 व 2 पदांवरील विविध विभागातील वरिष्ठ अधिकार्यांकडे अतिरिक्त पदभार देण्यात येवू नये.अशी मागणी विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांनी केली. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)