पिंपरी : शहरामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत की, जेथे डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात रोज होत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी महापालिका स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेनुसार परिसरात धूर फवारणी करीत असते. मात्र एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने केलेल्या पाहणीनुसार अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ही धूर फवारणी होय. धूर फवारणी करताना नजरेस आलेल्या गोष्टी इसिए टीम सदस्यांनी महापालिका वैद्यकीय संचालक डॉ.पवन साळवी यांच्याशी चर्चा केली. धूर फवारणी ऐवजी कीटक नाशकांची औषध फवारणी करावी, असा उपाय यावेळी महापालिका अधिकार्यांना सूचविण्यात आले.
No comments:
Post a Comment