Saturday, 9 February 2019

Pimpri : क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती तर्फे रविवारी भूमिवंदन, पारधी बांधवांना गाईचे वाटप

एमपीसी न्यूज -क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने येत्या रविवारी (दि.10) भूमिवंदन, कुर्डुवाडी परिसरातील दहा पारधी बांधवांना गाईचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पुणे सायन्स फोरम आई गुरुकुलम यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘डिजिटल सायन्स लॅब’चे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 

Pimpri: शास्तीकर माफीसाठी विरोधक सोमवारी महापालिकेला घालणार घेराव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोडबाबतच्या प्रश्नांकडे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने येत्या सोमवारी (दि.11) दुपारी तीन वाजता मानवी साखळीव्दारे महापालिका मुख्यालयाला घेराव घालणार आहेत. 

Bhosari: रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय मागे घ्या, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने विरोध करु’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विविध प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. सत्ताधारी उद्या महापालिका खासगी संस्थेस भाडेतत्वावर चालविण्यास देण्याची निविदा काढतील, अशी उपरोधिक टीका शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केली आहे. रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय मागे घ्या, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने विरोध करु’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Pimpri: मोरवाडीत रविवारी रक्तदान, आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त येत्या रविवारी (दि.10) मोफत रक्तदान व आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोरवाडी, म्हाडा कॉलनीतील एसएनबीपी शाळेत रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हे शिबिर होणार आहे. यामध्ये सामान्य तपासणी, महिलांची तपासणी, डोळे तपासणी, बालकांची तपासणी केली जाणार आहे. 

वाकड पोलिसांकडून तीन सराईत जेरबंद

पिंपरी – तीन आरोपींना अटक करत वाकड पोलिसांनी वाहनचोरी व सोनसाखळी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले असून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महम्मद आरिफ उस्मानअली सहाय्यक (रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. उमरीकला, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश), आयुब रियासत अली (रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. उमरीकला, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश), फहीम मतीन सिद्दीकी (रा. फुल चौक धुळे. मूळ रा. उमरीकला, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

‘अनधिकृत’चा प्रश्‍न कायम

पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमानुसारच नियमित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे शहरातील एक लाखाहूनही अधिक असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारने गेल्या वर्षी काढलेल्या आदेशातही अधिकृत करण्यासाठीची रक्कम जास्त असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दशकाहून अधिक काळ महत्त्वाची असलेली ही समस्या तशीच राहिली आहे.  

बाप्पांचा जन्मोत्सव उत्साहात

पिंपरी – गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष…, टाळ-मृदंगाचा गजर…, महापूजा, आरती, महाप्रसाद, पालखी सोहळा अशा भक्तिमय वातावरणात माघी गणेश जयंती उत्सव शुक्रवारी (दि. 8) पिंपरी-चिंचवड शहरात साजरा झाला.