Monday, 4 March 2019

पिंपरी चिंचवड न्यायालयाची १६ एकर जागेसाठी पहाणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड न्यायालयाची प्राधिकरण येथील १६ एकर जागेवर बांधकाम तातडीने करणे बाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश (CBI कोर्ट, पुणे) प्रल्हाद भगुरे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथील शाखा अभियंता पोतदार आणि कदम यांनी भेट दिली तसेच जागेची पहाणी केली. लवकरच बांधकाम नकाशा मंजूर करणेसाठी पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी सांगितले. 

अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यासाठी घेतली आमदार लांडगे यांची भेट -शीतल शिंदे

एमपीसी न्यूज – पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत आहे. कोअर कमिटीने घेतलेला निर्णय योग्य आहे का? हे विचारण्यासाठी तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली असल्याचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये शीतल शिंदे यांची वर्णी लागल्यापासून त्यांची निवड होणार तसा हिरवा कंदील 

एकही निविदा प्राप्त न झाल्यामुळे बोपखेल पुलाचे काम रखडणार

एमपीसी न्यूज – बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी पुल बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर महापालिकेने निविदा मागविल्या. पंरतु, एकही निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे पुलाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी (दि.8) लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी निविदा प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण होणे अशक्य आहे. 

देशभरातील कंपन्यांना ई-फायलिंग बंधनकारक

केंद्र सरकारने देशभरातील सर्व कंपन्यांना त्यांची माहिती ई-फायलिंग बंधनकारक केले आहे. त्यानुसार कंपन्यांना संचालक, कार्यालयाची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार असून, पुरावा म्हणून कार्यालयाचे छायाचित्रही द्यावे लागणार आहे. तसेच अ‍ॅक्टिव्ह (फॉर्म २२ ए) हा ई-अर्ज कंपनी सचिवाची नेमणूक करून भरावा लागणार असल्याची माहिती इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेकेट्ररी ऑफ इंडियाचे (आयसीएसआय) अध्यक्ष रणजित पांडे यांनी दिली.

भोसरीत भाजपची ’विजय संकल्प बाईक रॅली’ उत्साहात

भोसरी ः भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बाईक रॅली उत्साहात पार पडली. ही बाईक रॅली रविवारी सकाळी दहा वाजता सुरु झाली. सुमारे 52 किलोमीटर अंतर परिसरातून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध संपर्क अभियान राबविण्यात येत आहेत. त्यातील ’विजय संकल्प बाईक रॅली’ हे एक अभियान आहे. या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून येणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी सक्रिय करण्यात येत आहे.

भोसरीकरांनी वेगळी भुमिका घेतल्यास पलटू शकते बाजी?

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरी मतदार संघातील विलास मडिगेरी यांचा भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, नाराज झालेल्या चिंचवड मतदार संघातील भाजपच्या शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पाठिंब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भोसरीतील उमेदवार असला तरी त्यांच्यावर वेगळा ’शिक्का’ असल्याचे, महापौर राहुल जाधव म्हणाले. तर, भोसरीतील स्थायीच्या सदस्यांनी आमचा उमेदवार शीतल शिंदे अशी भुमिका घेतली. त्यामुळे प्रत्यक्षात भोसरीकरांनी वेगळी भुमिका घेतल्यास बाजी पलटू शकते. राष्ट्रवादी, शिवसेना, भोसरीतील सदस्य आणि शीतल शिंदे स्व:ता असे मिळून नऊ तर भाजपकडे सातच मतदार राहतात. त्यामुळे बंडखोरी न शमल्यास वेगळाच निकाल लागू शकतो.

पुण्यातील हाउसिंग सोसायट्यांनो, क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज व्हा!

पुणे - तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते? मग तुमच्या सोसायटीतील लहानथोरांना एकाच टीममध्ये या क्रिकेट सामन्यात खेळता येईल, अशी तुमची एकच टीम करण्याची संधी घेऊन आली आहे ‘सकाळ सोसायटी क्रिकेट लीग’. पुण्यातील हाउसिंग सोसायटीच्या या हाफ पीच क्रिकेट लीगची नावनोंदणी सुरू झाली आहे.