Sunday, 19 April 2020

Video : पिंपरी : एसटीची चाके रूतलेली; दीड कोटीचा फटका

पिंपरी - प्रतिदिन 18 किलोमीटर धावणारी...दिवसाला सहा लाखाचे उत्पन्न मिळवून देणारी "लालपरी' आजच्याघडीला "लॉकडाउन'मध्ये अडकून पडली आहे. गेल्या 28 दिवसाच्या कालावधीत सुमारे 5 लाख 4 हजार किलोमीटर धावणारी बसची चाके जागीच थांबल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगाराचे दीड कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. परिणामी आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळाची चाके अधिकच खोल रूतली आहेत.

आयटीयन्सच्या नोकऱ्यांवर “करोना’ संकट

नोकरीवरून काढल्याची शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांची तक्रार
पिंपरी -“करोना’मुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत एकाही कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढू नका, असे राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी देखील आवाहन केले आहे. परंतु पुणे अणि पिंपरी-चिंचवडमधील आयटी कंपन्यांमधील अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे

भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना उन्हात उभे राहण्याची शिक्षा

पिंपरी – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने मोकळ्या मैदानात मंडई सुरू केल्या आहेत. मात्र व्यापाऱ्यांना स्वतःच्या डोक्यावरही छत्री उभारण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे व्यापाऱ्यांना महापालिकेने एकप्रकारे उन्हात उभे राहण्याची शिक्षा सुनावली आहे.

गरजूंना वाटपासाठी प्रत्येक नगरसेवकाला 5 लाखाचे धान्य खरेदी करून द्यावे

महापौर उषा ढोरे यांची आयुक्तांना सूचना
पिंपरी (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणारे कामगार, गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या प्रभागात धान्य वाटप करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धान्य खरेदी करून वाटपासाठी देण्यात यावे. तसा प्रस्ताव नजीकच्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवावा, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

डाळींची मागणी वाढली

पिंपरी (प्रतिनिधी) – करोना विषाणूच्या भीतीने जवळपास 50 टक्के नागरिकांनी मांसाहारासह महाग झालेल्या पालेभाज्यांचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींना रोजच्या आहारात स्थान दिल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री सुमारे 30 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. तूर आणि चणा डाळीला जास्त मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.

Saturday, 18 April 2020

गस्तीसाठी बजाज ऑटो कडून पिंपरी चिंचवड पोलिसांना 29 दुचाकी

एमपीसी न्यूज – शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी बजाज ऑटो कडून 29 दुचाकी पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे असलेल्या अपुऱ्या वाहनांची गौरसोय लक्षात घेत बजाज ऑटोने हा मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना आणखी प्रभावीपणे गस्त घालून त्याची अंमलबजावणी करता यावी यासाठी महिंद्रा कंपनीकडून 11 एप्रिल रोजी 10 कार देण्यात आल्या […]

Corona Update 17th April | Zone wise positive cases and containment areas