Thursday, 22 November 2012

पिंपरीत एक लाख दुबार मतदार नावे

पिंपरीत एक लाख दुबार मतदार नावेपिंपरी - शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत एक लाख आठ हजार दुबार नावे आढळली आहेत. पहिल्या टप्प्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 32 हजार दुबार मतदारांची शहानिशा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यावर आक्षेप नोंदविण्याचा मंगळवारी (ता. 20) अखेरचा दिवस आहे. त्यानंतर दुबार मतदारांना नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. खासदार गजानन बाबर यांनी पिंपरी, भोसरी, आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघांत तब्बल एक लाख आठ हजार दुबार मतदार असल्याचे निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिले.

अमेरिकेतील अनेक प्रकल्प शहरात राबविणे शक्‍य

अमेरिकेतील अनेक प्रकल्प शहरात राबविणे शक्‍य पिंपरी - पर्यायी उत्पन्न स्रोत, सांडपाणी, घनकचरा आणि आपत्कालीन व्यवस्थापन, नगररचना व सार्वजनिक वाहतूक, असे अमेरिकेतील अनेक प्रकल्प पिंपरी-चिंचवडमध्ये राबविणे शक्‍य असल्याचे मत आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्‍त केले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर डॉ. परदेशी यांनी सोमवारी (ता. 19) आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

"केवायसी'चा बाऊ नको

"केवायसी'चा बाऊ नकोगॅस वितरकांकडून सरसकट सर्वांना केवायसी (नो यूवर कस्टमर) अर्ज भरून देण्याची सक्ती केली जात असून, हा अर्ज भरून दिला नाही, तर व्यावसायिक दरात सिलिंडर घ्यावा लागेल, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे. वस्तुत: एका कुटुंबाकडे एकच गॅसजोड असल्यास त्यांनी तूर्त "केवायसी' भरून देण्याची गरज नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वितरक विनाकारण त्रास देत असतील, तर जिल्हा प्रशासन वा गॅस कंपन्यांशी संपर्क साधावा. 
- संतोष शाळिग्राम 

१७९ रिक्षाचालकांवर कारवाई

१७९ रिक्षाचालकांवर कारवाई: प्रवासी नाकारणा-या सुमारे १७९ रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. या रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात येणार आहे. रिक्षाचालकांकडून दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. नजिकच्या काळात अचानकपणे ही मोहिम राबवण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

Voter registration: Over 2 lakh applications received

Voter registration: Over 2 lakh applications received: ADMN has received 1,83,452 application for inclusion of names, while there were a total of 10,791 names for deletion and 21,267 applications for correction

कसाबला फाशी दिली हे चांगलेच झाले, पण.... !

कसाबला फाशी दिली हे चांगलेच झाले, पण.... !
पिंपरी, 21 नोव्हेंबर
मुंबईमध्ये झालेल्या 26/11 हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला आज (बुधवारी) सकाळी पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. या फाशीनंतर देशभरासह पिंपरी-चिंचवड शहरातही जल्लोश, आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. फाशी देण्यासाठी उशीर झाल्याची खंत, त्याला जगजाहीर फाशी देण्याची इच्छा आणि त्याचा दफनविधी येरवड्यात करायला नको अशा विविध प्रतिक्रिया व्यक्त करत शहरवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

ज्येष्ठ महिलांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

ज्येष्ठ महिलांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद
पिंपरी, 20 नोव्हेंबर
पोलीस असल्याची बतावणी करून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ महिलांच्या अंगावरील मौल्यवान दागिने लुटणारी चार जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. भिवंडीतील एका सराफासह तीन सराईत गुन्हेगारांकडून तब्बल 20 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून एक किलो सोन्याचे दागिने, सोन्याची लगडी तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने अशा सुमारे 35 लाख रुपयांच्या ऐवजाची 'रिकव्हरी' पोलिसांनी केली आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कामगिरी केली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in