Wednesday, 5 December 2012

Now, common admission schedule for all schools in Maharashtra

Now, common admission schedule for all schools in Maharashtra: The state directorate of education will issue a common admission schedule for all schools in the next 10 days. Schools will have to set their admission dates and deadlines as per this schedule, announce dates for the issue of application forms and the last date for receiving them.

Six found guilty of Sagar Sahani’s murder

Six found guilty of Sagar Sahani’s murder: A special court here on Tuesday pronounced six of the 11 accused guilty in the sensational kidnapping and murder of 22-year-old Sagar Sahani, son of a Pimpri businessman, for a ransom of Rs 2 crore in 2005. The quantum of punishment will be declared on Friday.

कमर्शिअल सिलिंडरच्या दरात वाढ

कमर्शिअल सिलिंडरच्या दरात वाढ: आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरात ७५ रुपयांनी वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये एक हजार ७०१ रुपयांना मिळणारा सिलिंडर या महिन्यात एक हजार ७७६ रुपयांना उपलब्ध होणार आहे. दरम्यान केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने नागरिकांचा थंडा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

घरकुलाचा ताबा देण्यात अडचण

घरकुलाचा ताबा देण्यात अडचण: पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वस्त घरकुल प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थींना ताबा देता येऊ शकत नसल्याचे प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (चार डिसेंबर) मान्य केले. नवनगर विकास प्राधिकरणाकडून जागेचे पैसे न दिल्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाटचाल पर्यटनाच्या दिशेने

वाटचाल पर्यटनाच्या दिशेने: पिंपरी- चिंचवडच्या चिरंतन आणि चिरस्थायी विकासासाठी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून, या प्रकल्पाचे मंगळवारी (चार डिसेंबर) सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, याअंतर्गत सिटी सेंटर विकसित करण्याबरोबरच पर्यटन केंद्राचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगण्यात आले.

नर्सरी, केजीच्या प्रवेशांना ब्रेक!

नर्सरी, केजीच्या प्रवेशांना ब्रेक!: वंचित आणि दुर्बल घटकांमधील मुलांना शालेय प्रवेशामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याच्या तरतुदीला खासगी शाळांकडून हरताळ फासला जात असल्याने, नर्सरी व केजीच्या प्रवेशप्रक्रिया थांबविण्याचा आदेश राज्याचे शिक्षण संचालकांनी दिले आहेत. या कारवाईमुळे प्रवेशप्रक्रियांविषयी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘BSNL’ हेल्पलाइनला हवे मदतीचे ‘कनेक्शन’

‘BSNL’ हेल्पलाइनला हवे मदतीचे ‘कनेक्शन’: ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी किंवा त्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी उपलब्ध असलेला ‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (बीएसएनएल) हेल्पलाइन क्रमांकालाच (१५००) गेल्या दहा दिवसांपासून ‘हेल्प’ची गरज आहे. ग्राहकांकडून या क्रमांकावर केला जाणारा संपर्क कोणत्याही प्रतिसादाअभावी पूर्णच होत नसल्याची तक्रार केली जात आहे.