Saturday, 15 February 2014

पर्यावरण मंडळाचे उद्घाटन


पिंपरी : लांडेवाडी, भोसरी येथील कला महाविद्यालयात पर्यावरण मंडळाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, संस्थेचे विश्‍वस्त मारुती वाघमोडे, प्राचार्य डॉ. डी. डी. रणनवरे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. रणनवरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पठाण यांनी व्याख्यानात खेडेगावापासून जपानपर्यंत पर्यावरणाच्या बदलाची विविध उदाहरणे दिली. पाण्याचा चांगला वापर करावा. नद्या स्वच्छतेच्या मोहिमा राबवाव्यात. पुढील ७0 वर्षांनंतर पाणी रेशनिंगवर विकत मिळेल. महाविद्यालयीन युवकांनी एकत्र येऊन पर्यावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा. प्रदूषण थांबविण्यासाठी भोसरी व सभोवतालच्या प्रदेशामध्ये जाऊन कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. म्हणून पर्यावरण वाचवा हा संदेश डॉ. पठाण यांनी दिला. जैवतंत्रविज्ञान विभागप्रमुख प्रा. एस. एन. चव्हाण यांनी परिचय करून दिला. प्रा. विनोद मैंद यांनी सूत्रसंचालन केले. 

आयुक्तांच्या 'सांगो-वांगी' ...

माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी तयार केलेला सन 2014-15 चा महापालिकेचा 'जेएनएनयूआरएम'सह 3400 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने आज (शुक्रवारी) हिरवा कंदील दाखविला. मात्र, त्याला नवनियुक्त आयुक्त राजीव जाधव

मिळकतकराचा भरणा मोबाईलव्दारे ...

नागरी सुविधेसाठी ई-गव्हर्नन्सचा प्रभावीपणे अंमलबजावणी करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता एम (मोबाईल) गव्हर्नन्सच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना मोबाईलव्दारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे महापालिकेच्या विचाराधीन

Cleanliness will top my priority list: PCMC chief

Rajiv Jadhav , the new PCMC Commissioner, shares his plans for the township with Tanaji Khot What will be your priorities as the PCMC chief? For me, all issues are equally important, but cleanliness of the city will top my priority list.
Cleanliness will top my priority list: PCMC chief

Friday, 14 February 2014

नगरसेवकांकडे तक्रारी करणा-या शिक्षकांना 'शो-कॉज' पाठवा

अतिरिक्त आयुक्तांची मोगलाई 
महापालिकेच्या शाळांमधील समस्यांकडे लक्ष वेधणा-या शिक्षकांबरोबर अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे सूडबुद्धीने वागत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थायी समिती सभेत आज (गुरूवारी) समोर आला. सांगवीतील एका शाळेत मुख्याध्यापक नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला

अनधिकृत बांधकामांविषयीचे धोरण अन् ‘तारीख पे तारीख’

पिंपरी-चिंचवड शहरातील व त्याअनुषंगाने राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी नेत्यांनी सातत्याने केली.

दापोडी येथील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याची मागणी

दापोडी येथील झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी गटार तुंबणे, ड्रेनेज तुंबणे व अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.