Wednesday, 11 April 2018

पिंपरी शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयावर शिक्कामोर्तब

पिंपरी - शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत शहरातील 10 आणि ग्रामीण भागातील पाच अशी 15 पोलिस ठाणी असतील. 

Image result for police commissioner pimpri

Police commissionerate for Pimpri-Chinchwad gets govt nod

The Maharashtra government today gave its approval for setting up a separate police commissionerate for the Pimpri-Chinchwad industrial township, located on the outskirts of Pune city.

Pimpri-Chinchwad to get police commissionerate

Mumbai: The Maharashtra cabinet on Tuesday cleared the proposal to carve out a separate Pimpri-Chinchwad Police commissionerate from the existing Pune police commissionerate, with an aim to tackle the growing population, urbanisation, industrialisation, number of motor vehicles, political constituencies and increasing number of complaints.

आता गुन्हेगारीला आळा बसणार

पिंपरी - पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचे शहरातील विविध संघटना, राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे... 

आयुक्तालयासाठी ३९३ कोटी मंजूर

पिपंरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, गुन्ह्यांची संख्या, औद्योगिकीकरण, शिक्षणसंस्था, हिंजवडीतील आयटी नगरीच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र आयुक्तलयाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आयुक्तालयासाठी ३९३ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. दरम्यान, मुख्यालयासाठी तात्पुरती भाडे तत्वावर जागा घेण्यात येणार आहे. तसेच या आयुक्तालयासाठी २६३३ नवीन पदांची निर्मिती करणार असल्याचेही बापट म्हणाले.

स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयाला लाभला मुहूर्त

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय निर्माण करण्यासह त्यासाठी होणाऱ्या खर्चास मंत्री मंडळाच्या बैठकीत मंगळवारी (दि. 10) मान्यता देण्यात आली. लवकरच शहरास स्वतंत्र आयुक्‍तालय मिळणार असल्याचे आता निश्‍चित झाले आहे. स्वतंत्र आयुक्‍तालयासाठी दोन हजार 633 नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. या नव्या पोलीस आयुक्‍तालयात एकूण 15 पोलीस स्टेशन्सचा समावेश असणार आहे. यामध्ये पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील दहा आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील पाच स्टेशनचा यामध्ये समावेश असणार आहे. महाराष्ट्र दिन अर्थात एक मे पासून नवे आयुक्‍तालय सुरु होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

प्रश्‍नपत्रिका ‘मेट्रो’ची

केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेतही आम्हाला स्पष्ट बहुमताने निवडून द्या, तुमची सारी स्वप्ने साकार करून दाखवू, असे आश्वासन दिलेल्या भारतीय जनता पक्षाला फक्त पुणेकरांनीच नव्हे, तर पिंपरी-चिंचवडकरांनींही घसघशीत बहुमताने सत्ता दिली. या वर्षभरात कोणकोणती कामे भाजपने केली, कोणती प्रगतीपथावर आहेत, कोणते नवे प्रकल्प येऊ घातले आहेत, कोणते संकल्प सोडले जात आहेत, याचे रंगीबेरंगी अहवालही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. मात्र याचबरोबर लोकहिताची अनेक कामे रखडली आहेत.