पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी होणाऱ्या खर्चास मंत्री मंडळाच्या बैठकीत मंगळवारी (दि. 10) मान्यता देण्यात आली. लवकरच शहरास स्वतंत्र आयुक्तालय मिळणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. स्वतंत्र आयुक्तालयासाठी दोन हजार 633 नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. या नव्या पोलीस आयुक्तालयात एकूण 15 पोलीस स्टेशन्सचा समावेश असणार आहे. यामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील पाच स्टेशनचा यामध्ये समावेश असणार आहे. महाराष्ट्र दिन अर्थात एक मे पासून नवे आयुक्तालय सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment