महापालिकेतर्फे चिंचवड येथे उभारण्यात येत असलेल्या एम्पायर इस्टेट पुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. येत्या सोमवारी (दि.7) हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तसेच या पुलाचे संत मदर तेरेसा असे नामकरण देखील करण्यात येणार आहे. यासोबत कासारवाडी येथील रॅम्प आणि पिंपळेगुरव येथील वाय जंक्शनचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात येणार आहे.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 5 May 2018
खोदाईअभावी "नो कनेक्शन'
पिंपरी - तुम्ही जर शहरातील वाकड, रावेत किंवा भोसरीमधील पांजरपोळ परिसरात राहत असाल आणि तुम्हाला भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) लॅन्डलाइन फोनचे नवीन कनेक्शन मिळू शकते का, असा प्रश्न जर विचारलात तर त्याचे उत्तर नाही असेच असेल. कारण गेल्या तीन वर्षांपासून बीएसएनएलला केबल टाकण्यासाठी आवश्यक असणारी नवीन खोदाई करता येत नाही. महापालिकेचा खोदाईचा दर जास्त असल्याचे बीएसएनएलचे म्हणणे आहे.

दिव्यांगांच्या घरांसाठी पिंपरीमध्ये आंदोलन
पिंपरी - महापालिकेने दिव्यांगांसाठी भवन बांधण्यापेक्षा त्यांना घरे द्यावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अपंग सेलच्या शहर शाखेने शुक्रवारी (ता. 4) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले.

नालासफाई मेअखेर होणार का?
पिंपरी - शहर आणि उपनगरांमधील काही नाल्यांचीच स्वच्छता झाली आहे. अनेक नाले दलदलीने, कचऱ्याने भरून वाहत आहेत. नाल्यात गवत, झुडपेही वाढली आहेत. गवळीमाथा येथील नाल्यांच्या भिंतीवरच घराच्या भिंती उभारल्याने पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका आहे. या नाल्यांची स्वच्छता मेअखेर होणार का, असा सवाल नागरिक करीत आहेत. त्याची चित्रमय झलक टिपली आहे ‘सकाळ’चे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी

पार्किंगसाठी काळेवाडीत बेकायदा शुल्क
पिंपरी - काळेवाडी येथे रस्त्याच्या कडेला दिवसरात्र थांबणाऱ्या माल वाहतूक ट्रक, खासगी कंपन्या व ट्रॅव्हल बसचालकांकडून पार्किंगसाठी गावगुंडांकडून बेकायदा शुल्क आकारले जाते; तसेच हा बीआरटी मार्ग असून, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाहनांमुळे कामात अडथळा निर्माण होतो, अशी नागरिकांची तक्रार आहे.

मुख्य रस्त्यावरच भरते मंडई
रावेत - मंडईसाठी त्वरित जागा देण्याची मागणी रुपीनगरमधील भाजी विक्रेत्यांच्या संघटनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. संघटनेचे शंभराहून अधिक सदस्य आहेत.

कामांच्या अंदाजपत्रकासाठी “व्हाऊचर’ दर
पिंपरी – महापालिकेच्या वतीने विविध विकास कामे आणि भांडवली कामांसाठी साहित्य खरेदी करण्यात येते. या कामांसाठी निविदा प्रक्रीया राबविताना उपलब्ध असलेल्या साहित्याच्या व्हाऊचरच्या दराचा विचार करूनच नियोजित कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात यावीत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)