Monday, 4 June 2018

जागतिक पर्यावरण दिवसाचे आयोजन, इको-फ्रेंडली उपक्रमांचे प्रदर्शन व पवनामाईची आरती

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून Connecting NGO PCMC व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून मंगळवार रोजी मोरया गोसावी मंदिराशेजारील जिजाऊ पर्यटन केंद्रात पर्यावरण दिन साजरा करण्यात येईल. 

  • कार्यक्रम: 'जागतिक पर्यावरण दिवस' 
  • दिवस व वेळ: दिनांक ५ जून, मंगळवार सायंकाळी ४ वाजता
  • स्थळ: जिजाऊ पर्यटन केंद्र, चिंचवड 
  • मॅप: https://goo.gl/maps/UtdxSrJADLL2
  • RSVP https://www.facebook.com/events/575523252819541/

Health dept seizes 2200kg of plastic carry bags in Pimpri Chinchwad

PIMPRI CHINCHWAD: Ahead of the World Environment Day on Tuesday, the health department officials have seized 2,190kg of plastic carry bags in two months from hawkers, vegetable vendors and shopowners in all the eight zones of Pimpri Chinchwad municipal limits.

पिंपरीत अतिक्रमणांची ठिकाणे निश्चित; दररोज कारवाई करण्याचे नियोजन

सहशहर अभियंता राजन पाटील यांची माहिती

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या अतिक्रमणांची उशिरा का होईना, महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. शहरातील अतिक्रमणे झालेल्या ठिकाणांची माहिती एकत्रित करण्यात येत असून त्यानुसार मुख्यालयाच्या नियंत्रणाखाली दररोज कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चिंचवडमध्ये तीन घरमालकांना दंड

पिंपरी : घरमालकाने भाडेकरूंची माहिती दिली नाही. त्यामुळे चिंचवड पोलिसांनी घरमालकांवर खटला भरला. न्यायालयाने त्या तीन घरमालकांना दंड ठोठवल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी दिली. 
अनेकदा घरमालक भाडेकरू ठेवतात. भाडेकरूंची त्यांची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक असूनही मालक ती देत नाहीत. अशा घरमालकांना शोधून त्यांच्यावर खटला दाखल करण्याची मोहीम पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यानुसार भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तिघांना न्यायालयाने दंड ठाठोवला आहे. अशीच मोहीम संपूर्ण शहरभर हाती घेतल्याची माहिती उपायुक्‍त शिंदे यांनी दिली. 

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अधिकाऱ्यांवर दाखल करा

पिंपरी : शहरातील होर्डिंग पडून दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे शहर शिवसेनेने केली आहे.

 

खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यअहवालाचे उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कारर्कीदीला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार बारणे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. 

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेंना पिंपरी चिंचवड भाजपातर्फे अभिवादन

पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.