दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. मुले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत. पुढे इंजिनिअरिंग व मेडिकलसाठी प्रवेश घ्यायची मुलांची इच्छा आहे; मात्र कंपनीकडून पगारच झालेला नाही. त्यामुळे मुलांना पुढे प्रवेश कसे घ्यायचे? असा सवाल ‘एचए’ कामगार विचारत आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 9 June 2018
भाजपच्या ‘फरार’ नगरसेवकांमुळे क्रीडा समिती सभा रद्द
पिंपरी (Pclive7.com):- गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे दोन नगरसेवक सध्या फरार आहेत. क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे आणि सदस्य सुजाता पालांडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र आज महापालिकेत होणाऱ्या क्रीडा समितीच्या बैठकीला हे दोघेही उपस्थित राहणार की नाहीत, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आजची सभाच चक्क रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर ओढावली आहे.
जागेचा मालकी हक्क नसताना पिंपरी महापालिकेकडून बिल्डरला बांधकाम परवानगी
पिंपरी -चिंचवड महापालिकेचा सर्वाधिक बदनाम असलेला नगररचना विभाग स्थानिक शेतकऱ्यांना वेड्यात काढून बिल्डरांच्यासाठी कशा प्रकारे पायघड्या घालते, याचे एक ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. मुंबईतील एका बिल्डरला वाकडमध्ये गृहप्रकल्प उभारण्यासाठी कागदपत्रांच्या आधारे एका सर्व्हे क्रमांकावर परवानगी दिली. प्रत्यक्षात हे बांधकाम दुसऱ्याच सर्व्हे क्रमांकावर सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात वाद सुरू असताना नगररचना विभागाने बांधकामांसाठी एफएसआय देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात दावा दाखल केलेले शेतकरी महेश भुजबळ यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने दिलेली बांधकाम परवानगी रद्द न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सोमवारी महापालिका कामगारांची पिंपरीत राज्यस्तरीय बैठक
राज्यभरातील सर्व महापालिका व नगरपालिकेतील कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिका-यांची राज्यस्तरीय बैठक शनिवारी (दि.9) पिंपरीत आयोजित केली आहे, अशी माहिती महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड दर्शन बस खरेदीला विरोध !
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड दर्शन बस खरेदी करण्याचा विषय काल पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने घेतला मात्र त्यास शहरातून विरोध होत आहे.
मॉल-मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क नको
मॉल, मल्टिप्लेक्स तसेच हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी भूमिका शहर सुधारणा समितीने घेतली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वतंत्र धोरण तयार करून ते समितीपुढे सादर करावे, अशा सूचना शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आली आहे. सध्या शहरातील ३५ मॉल-मल्टिप्लेक्सपैकी १२ ठिकाणी पार्किंग शुल्क आकारण्यात येत नाही. पार्किंग शुल्काच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांची लूट होत असल्याने ती टाळण्यासाठी धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा शहर सुधारणा समितीने केला आहे.
वाकडमध्ये वर्षाला हजार गुन्ह्यांची नोंद
सर्वाधिक गुन्हे दाखल होणाऱ्या वाकड पोलिस ठाण्याची हद्द विस्तिर्णपणे पसरलेली आहे. दीड ते दोन हजार मोठे गृहप्रकल्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात. रहाटणी, थेरगाव, कस्पटेवस्ती, वाकड, पुनावळे, ताथवडे याभागातील उच्चभ्रू लोकवस्ती तर दुसरीकडे काळेवाडी गावठाण यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे.

Subscribe to:
Posts (Atom)