Sunday, 12 August 2018

अतिरिक्त हस्तांतर शुल्कवसुलीला चाप

पंचवीस हजारांपर्यंत आकारणीचे सहकार आयुक्तांचे आदेश

फ्लॅट अथवा गाळ्यांची विक्री करताना अव्वाच्या सव्वा हस्तांतर शुल्क (प्रीमियम) आकारणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत हस्तांतर शुल्क आकारता येणार आहे, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे फ्लॅटची खरेदी-विक्री करणाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी करणाऱ्या सोसायट्यांना चाप लागणार आहे.

अभिजित लोंढे जर्मनीतही 'आयर्न मॅन'

शर्यत साडेबारा तासात पूर्ण; पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात तुरा 

Why Pimpri-Chinchwad desperately needed a police commissionerate

With the State Home Department finally issuing a notification for setting up the Pimpri-Chinchwad Police Commissionerate on Friday, local residents have every reason to cheer. They have been demanding the police commissionerate for more than 15 years, to tackle the consistently rising crime rate in the industrial city.

पिंपरी-चिंचवड पोलिसांमध्ये आयुक्तालयाची लगबग

पिंपरी- चिंचवडच्या स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार येत्या पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात आयुक्तालयाची लगबग सुरू झाली आहे. शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.10 ) याबाबतचा अध्यादेश जारी केल्यानंतर रंगरंगोटीसह इतर कामांना वेग आला आहे. 

स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस खरेदी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस खरेदी करणार आहे. दीड हजार बॉटल्ससाठी 3 लाख 88 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

पिंपरी पालिकेत सुरू असते ‘वॉशिंग सेंटर’

महापालिकेच्या कारभारावर प्रशासनाचा वचक नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे. सुटीच्या काळात पालिका आवारात चक्‍क वॉशिंग सेंटर सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. पालिकेत स्वच्छता करणार्‍या बी.व्ही.जी.च्या सफाई कामगारांकडून  कर्मचार्‍यांची खासगी वाहने धुवून घेत आल्याचे निदर्शनास आले आहे.

ऑनलाइन फूड ऍप्समुळे हॉटेल व्यवसाय घटला !

पुणे - शहर आणि उपनगरांत 3 हजारांहून जास्त रेस्टॉरंट आणि हॉटेल्स आहेत. ऑनलाइन फूड ऍप्सवरून घरी, ऑफिस किंवा महाविद्यालयांमध्ये खाद्यपदार्थ मागविण्याचा कल तरुणांमध्ये वाढत आहे. परिणामी, शहरातील हॉटेल व्यवसायामध्ये 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.