एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ब-याच ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे आहेत. या वास्तुंच्या संवर्धनासाठी पुरातत्व (हेरीटेज) समितीची स्थापना करून कार्यवाही करण्याची नगरसेवक आणि नागरिकांकडून मागणी होत आहे. हेरीटेज समिती स्थापन करण्यापूर्वी महापालिका हद्दीतील ऐतिहासिक वास्तुंची यादी करण्यात येणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 22 January 2019
महापालिकेत वास्तुविशारदांना “अच्छे दिन’
पिंपरी – वाढीव दराच्या निविदांना मंजुरी, ठराविक ठेकेदारांनाच कामांचे कंत्राट दिले जात असल्याने महापालिकेच्या कारभाराभोवती संशयाचे ढग दाटले असताना आता त्याच वास्तू विशारदांच्या नेमणुकीची भर पडण्याची शक्यता आहे. प्राथमिक शाळा, सभागृह बांधण्याबरोबरच खेळाच्या मैदानात प्रेक्षक गॅलरी उभारण्यासाठी महापालिकेमार्फत एकाच वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे.
चिंचवडमधील कामगार कार्यालयाला अवकळा
पिंपरी – पुणे जिल्हा कामगार उपआयुक्तांच्या अखत्यारीत चिंचवड 1985 पासून कामगार कार्यालय कार्यरत आहे. या शासकीय कार्यालयाची अतिशय भयानक अवस्था झालेली आहे,
याच कार्यालयात दुकाने निरीक्षक कार्यालय व माथाडी बोर्डाचे शासकीय कार्यालय असल्याने नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. चिंचवड येथे असणाऱ्या या कार्यालयाची इमारत ही खुप जुनी असून तुटलेल्या खिडक्या व पायऱ्यांचे लोखंडी संरक्षक ग्रील बऱ्याच वर्षांपासून तुटलेलेच आहेत. तसेच बाहेरील आवारात विद्युत दिवेही नाहीत. त्यामुळे ये जा करताना काळजी घ्यावी लागते, बऱ्याच दिवसांपासून भिंतींना रंगरंगोटी झालेली नाही. कार्यालयात जुनाट फर्निचर व मातीच्या ढिगाऱ्यात असणारी कागदपत्रांचे गठ्ठे यामुळे या कार्यालयाचे वातावरण नेहमीच उदासीन असते.
पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र ‘कामगार कार्यालय’ स्थापन करा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड ही कामगार व औद्योगिकनगरी असल्याने शहरातील कामगारांच्या हितासाठी पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र “हायटेक व सुसज्ज कामगार कार्यालय” उभारण्यात यावे अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष तथा बांधकाम कामगार सेनेचे उपाध्यक्ष किशोर हातागळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Chinchwad : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, हे कौतुकास्पद- डॉ. ई वायूनंदन
एमपीसी न्यूज -प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमधील शिशूवर्ग ते पदवीत्तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सातत्याने विविध उपक्रमे राबवून त्याच्या कलागुणाचा विकास केला जात आहे.
आता भोसरीत भरणार “इंद्रायणी थडी’
पिंपरी – शिवांजली सखी मंच व महेशदादा स्पोटर्स् फाउंडेशनच्या वतीने 8 ते 11 दरम्यान इंद्रायणी थडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रेचे उद्घाटन महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संयोजिका पूजा लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
…जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)