MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 3 June 2012
पिंपरी- चिंचवड महापालिकेला ई- गव्हर्नन्सबद्दल सुवर्णपदक
पिंपरी- चिंचवड महापालिकेला ई- गव्हर्नन्सबद्दल सुवर्णपदक: नवी दिल्ली - उत्कृष्ट ई- गव्हर्नन्ससाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये राज्य शासनाचा कृषी विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिका यांना केंद्र शासनाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्य सरकारे व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले जाणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्कारांवर यंदा बिगरकॉंग्रेस सरकारांनी वरचष्मा राखला आहे. सर्वोत्कृष्ट ई-गव्हर्नन्सबद्दल केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार आज येथे जाहीर झाले. प्रशासनिक कामकाजात इंटरनेट म्हणजेच ई-गव्हर्नन्सचा वाढत्या प्रमाणात वापर केल्यास भारतासारख्या देशातही भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणातरोखता येतो, असे मानले जाते. त्यामुळे ई-गव्हर्नन्स प्रणाली वापराबद्दलच्या राष्ट्रीय पुरस्कारांना महत्त्व आहे. राज्याच्या कृषी मंत्रालयाच्या आयुक्तालयाला घातक कीडनाशकांचे निरीक्षण व त्याबाबतच्या सल्लागार परियोजनेसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. पाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारची ऊस सूचना प्रणाली (एसआयएस) व राजस्थानातील माता- बालक आरोग्यकल्याण योजनेला बक्षिसे देण्यात येतील. पिंपरी- चिंचवड महापालिकेनेही सुवर्णपदक पटकावले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment