Sunday, 3 June 2012

गौरी खान होणार उद्योगनगरीची रहिवासी

गौरी खान होणार उद्योगनगरीची रहिवासी: पिंपरी - औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक व क्रीडानगरीकडे वाटचाल होत आहे. शहरातील काही लोकेशनला मराठी चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे. त्यापाठोपाठ हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार निवासासाठी या नगरीला पसंती देऊ लागले आहेत. अभिनेता शाहरुख खानची पत्नी व निर्माती गौरी खान ही पिंपळे निलख येथील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पात पेंट हाउससाठी इंटेरियर करत असून, तेथे घर खरेदी करण्याचाही तिचा विचार सुरू आहे. या गृहप्रकल्पाला भेट देण्यासाठी ती गुरुवारी (ता. 23) आली होती. तिने येथील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पातील नमुना सदनिका बघितली. त्यानंतर "सकाळ'च्या प्रतिनिधीशी ती बोलली. गौरी म्हणाली, ""मी येथील सहा हजार चौरस फुटांच्या पेंट हाउसचे इंटेरियर करत आहे. तसेच, ते खरेदी करण्याचाही विचार सुरू आहे.'' शहरामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व प्रियांका यादव यांची घरे आहेत. त्यापाठोपाठ गौरी खान पिंपळे निलखमध्ये घर खरेदी करण्याचा विचार करत असल्याने शहराला बॉलिवूडकडूनही पसंती मिळत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.

No comments:

Post a Comment