Sunday, 3 June 2012

चिंचवडचा उड्डाणपूल ठरतोय असून अडचण नसून खोळंबा

चिंचवडचा उड्डाणपूल ठरतोय असून अडचण नसून खोळंबा: पिंपरी - चिंचवड येथील उड्डाणपुलाचे चुकीचे नियोजन करण्यात आल्याने या पुलावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हा पूल असून अडचण नसून खोळंबा ठरला आहे. चापेकर चौक, चिंचवडगाव येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधला. या पुलावरील एक मार्ग जाण्यासाठी व एक मार्ग येण्यासाठी ठेवला आहे. याच महिन्यात दोन मालवाहतूक ट्रकमध्ये अपघात झाला होता. त्यामुळे पुलावरील वाहतूक पुन्हा चिंचवडगावातून वळविण्यात आली होती. तसेच, एखाद्या वाहनाच्या पुढे जाताना चापेकर चौक व चिंचवड जुना जकात नाका या ठिकाणी समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे येथे नेहमीच अपघात होतात. पुलावर रस्ता दुभाजक बसविण्यात आला नसल्याने अपघाताचे प्रमाण आणखीनच वाढले आहे. उड्डाणपुलाला बसविण्यात आलेल्या कठड्यांची उंची अतिशय कमी आहे. दुचाकीस्वाराला अपघात झाल्यास तो कठड्यावरून खाली पडण्याची शक्‍यता आहे. चिंचवडगावातून वाल्हेकरवाडी येथे जाताना थेरगाव पुलाकडून येणारी वाहने पुलाच्या खांबामुळे दिसत नाहीत. यामुळे या ठिकाणीही मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. तसेच पुलाखालून मोठ्या उंचीचे कंटेनर जात नसल्याने अनेकदा ते अडकून पडतात.

No comments:

Post a Comment