http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31672&To=9
शिक्षण अधिका-यांनाच दप्तर, बुटमोज्यांचे 'वाटप'
शिवसेनेचे अभिनव आंदोलन !
पिंपरी, 17 जुलै
शाळा सुरू होऊन महिना उलटल्यावरही महापालिका शाळांतील शेकडो विद्यार्थी दप्तर, पाट्या, बुटमोजे, कंपासपेटी आणि वह्यांविना अभ्यास करत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी (दि. 17) शिक्षण मंडळाविरोधात अभिनव आंदोलन केले. गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिका-याला दफ्तरे, वह्या, बुटमोज्यांचे 'वाटप' करत लवकरात लवकर शालोपयोगी साहित्य देण्यासाठी साकडे घातले.
No comments:
Post a Comment