Friday, 20 July 2012

प्रवाशांची अवैध वाहतूक चिंचवड स्टेशन येथे

मुंबईकडे जाणा-या प्रवाशांची अवैध वाहतूक चिंचवड स्टेशन येथे सर्रासपणे केली जाते. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक आणि त्यांचे मालक यांच्याशी पोलिसांचे असलेले अर्थपूर्ण संबंध यामुळेच ही वाहतूक राजरोसपणे चालू असल्याचा आरोप केला जातो. अवैध वाहतूक करणा-या वाहनांना द्रुतगती मार्गावर अपघात होऊन कित्येक प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. परंतु या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध घातले जात नसल्यामुळे या वाहतुकीला मोकळे रान मिळाले आहे.

 

No comments:

Post a Comment