चासकमानसाठी १0 कोटी: राजगुरूनगर। दि. १0 (वार्ताहर)
चासकमान धरणाची खेड तालुक्यातील प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहेत. या कामांसाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून, आवश्यक असणारे आणखी वीस कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
आमदार मोहित यांनी चासकमान प्रकल्पाच्या प्रलंबित कामांसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. चासकमान धरण पूर्ण होण्यापूर्वी कालवे, चार्यांची कामे झाली. परंतु, चार्या, पोटचार्यांना पाणी आले नव्हते. त्यामुळे चार्या, पोटचार्या गाडल्या गेल्या. आठ हजार हेक्टरला पाणी मिळणे अपेक्षित असताना अडीच हजार हेक्टरला पाणी मिळत आहे.
No comments:
Post a Comment