Monday, 13 August 2012

बिल्डर काळ्या यादीत

बिल्डर काळ्या यादीत: बेकायदा बांधकाम उभारणारे
पिंपरी । दि. १0 (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांच्या मुळापर्यंत जाण्याच्या इराद्याने बेकायदा बांधकामे करणार्‍या बिल्डरांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय आयुक्त श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे. इमारतींवर कारवाई झाल्यास सदनिका खरेदी केलेल्या सामान्य नागरिकांचे नुकसान होते. बिल्डरांना झळ पोहोचत नाही. अनधिकृत बांधकामे करून मिळविलेल्या काळ्या पैशाचा वापर पुढे ते अधिकृत गृहप्रकल्पांसाठी करतात. त्यांच्यावरच अंकुश ठेवण्याची आणि नागरिकांना जागरूक करण्याची आपली भूमिका आयुक्तांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

No comments:

Post a Comment