Wednesday, 15 August 2012

शहरात आणखी एक स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह

शहरात आणखी एक स्वाइन फ्लू पॉझिटिव्हपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. 11) स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला, अन्य चार जणांमध्येही त्याची लक्षणे आढळून आली. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले. शनिवारी शहरातील रुग्णालयांमध्ये दोन हजार 699 रुग्ण तपासणीसाठी आले होते. पैकी 460 जणांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आली, तर 149 रुग्णांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक "टॅमी फ्लू' औषध देण्यात आले.

No comments:

Post a Comment