http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32950&To=10
वायसीएमएचमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम ; दहा कोटींचा खर्च अपेक्षित
पिंपरी, 5 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यास आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रात अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविणारी पिंपरी ही पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा समितीचे सभापती जगदीश शेट्टी यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment