'तेरा' डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांचे 'तीन तेरा'
पिंपरी, 5 सप्टेंबर
पुणे ते लोणावळा मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने नऊ ऐवजी बारा डब्यांची लोकल मंजूर केली. मात्र प्रशासनाने 12 ऐवजी 13 डब्यांचा रेक पाठविला. या 13 डब्यांच्या लोकलमुळे सोय होण्याऐवजी प्रवाशांचे दररोज 'तीन-तेरा' वाजत आहेत. त्यामुळे हा रेक बदलून इतर रेकप्रमाणेच 12 डब्यांची लोकल उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment