भविष्य निर्वाह निधीद्वारे सत्तावीस लाखांचा पिंपरीत अपहार: पिंपरी । दि. १९ (प्रतिनिधी)
कंपनीतील कर्मचार्यांच्या वेतनातून कपात केलेल्या सुमारे साडे २७ लाखांचा भविष्य निर्वाह निधी स्टेट बॅँकेमार्फत खात्यात जमा न करता त्याचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी कंपनीच्या कार्यकारी संचालकासह, मुख्य वित्तीय अधिकार्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल कुप्पावरी रामआऊती (रा. लतिका सदन, बांद्रा वेस्ट, मुंबई) आणि नैनीश राजेंद्र बोरा (रा. ग्रीनपार्क सोसायटी, औंध) अशी आरोपींची नावे आहेत. भाऊसाहेब रघुनाथ काकडे (५६, रा. लेकव्यूह सोसायटी, सुखसागरनगर, कात्रज) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी औद्योगिक वसाहतीतील एच ब्लॉकमध्ये ट्युलाईट लिटाका फारमा लिमिटेडमध्ये आरोपी रामआऊती हे कार्यकारी संचालक तर बोरा मुख्य वित्तीय अधिकारी आहेत.
सुमारे ३00 कामगारांच्या वेतनातून नोव्हेंबर २0११ ते जुलै २0१२ या कालावधीत कपात केलेली भविष्य निर्वाह निधीचे २७ लाख २७ हजार ५२0 रुपये स्टेट बॅँकेतील खात्यात जमा करणे आवश्यक होते. परंतु, तसे न करता या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार लेखापरीक्षणादरम्यान उघडकीस आला.
No comments:
Post a Comment