बस मार्गांची माहिती "हेल्पलाइन'वर: कोणत्या मार्गावरील बस कोठे आणि कोणत्या भागातून जाईल, बसच्या फेऱ्या किती वेळाने आहेत... अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रवाशांना 31 ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबरला 9225320099 या हेल्पलाइनवर मिळू शकणार आहेत.
कॉल सेंटर क्षेत्रातील नॅव्हिजन बिझनेस सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीने "पुणे बस डे'च्या उपक्रमात ही हेल्पलाइन उपलब्ध करून आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे. "बस डे'मध्ये सर्वच क्षेत्रातील घटक सहभागी होत असताना कॉल सेंटर क्षेत्रातील या कंपनीलाही योगदान द्यावेसे वाटले. या कंपनीने पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधून हेल्पलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. प्रशासनाने होकार दिल्याने "बस डे'साठी ही हेल्पलाइन उपलब्ध असेल.
No comments:
Post a Comment