Thursday, 11 October 2012

बहुतांश नगरसेविकांचे "हाताची घडी आणि तोंडावर बोट'

बहुतांश नगरसेविकांचे "हाताची घडी आणि तोंडावर बोट': पिंपरी - स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच 65 महिला नगरसेविका निवडून आल्या. मात्र, त्यांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग अजूनही निम्मासुद्धा नसल्याचे पहिल्या सहामाहीत आढळून आले आहे. बोटांवर मोजण्याइतपत अनुभवी नगरसेविकांचा प्रत्यक्ष कामकाजामध्ये सहभाग दिसून येतो आहे, तर उर्वरितांपैकी काहींनी केवळ अनुमोदन, सूचक व उपसूचना मांडण्यासाठीच तोंड उघडले आहे. 

No comments:

Post a Comment