पिंपरी, 10 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन धोरणानुसार सामासिक अंतरामध्ये 20 टक्क्यांपर्यंत केलेली वाढीव बांधकामे दंड आकारुन नियमित केली जाणार आहेत. त्यासाठी अडीच ते तीन हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामासाठी प्रती चौरस फुट 25 रुपये, तीन ते पाच हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना 50 रुपये, पाच ते दहा हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना शंभर रुपये आणि एक हजार चौरस फुटापुढील बांधकामासाठी प्रती चौरस फुट पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत्या 19 ऑक्टोबर रोजी होणा-या महापालिका सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment