पिंपरी, 29 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जानेवारीपासून आजअखेरीस डेंग्यूचे 56 रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या ऑक्टोबर महिन्यात 23 रुग्ण आढळल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. डेंग्युच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली असून वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी डेंग्युच्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांकडून येणारे रक्ताचे नमूनेही महापालिकेकडून मोफत चाचणी करुन दिले जात आहेत.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment