आंतरराष्ट्रीय नकाशावरही पुणे ‘हिट्स’: पुणे। दि. ३0 (प्रतिनिधी)
‘आयटी सिटी’ म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या विकासाची भुरळ परदेशातील विकासकांनाही असल्याचे दिसून आले असून, विकास आराखडा पाहण्यासाठी चार दिवसांत महापालिकेच्या संकेतस्थळावर तब्बल १४ हजार ९४७ हिट्स पडल्या आहेत. यामध्ये अर्थातच अमेरिकेतून सर्वाधिक हिट्स असल्याचेही दिसून आले आहे.
शहराचा प्रारूप विकास आराखडा मुख्य सभेत मागील आठवड्यात सादर झाल्यानंतर चारच दिवसांत महापालिकेच्या संकेतस्थळावर हा विकास आराखडा पाहण्यासाठी या हिट्स पडल्या आहेत. मात्र, हा आराखडा अद्याप संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याने संकेतस्थळावरील महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या जुन्या २३ गावांचा आराखडा पाहिला जात आहे. याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी महापलिकेच्या संगणक विभागाने विशेष संगणक प्रणालीशी महापालिकेचे संकेतस्थळ जोडलेले आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळास मार्च ते ऑक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत ७ लाख ९७ हजार हिट्स मिळालेल्या आहेत. त्यातील ५५ हजार हिट्स जगभरातील १३७ देशांमधून आहेत. त्यातही २0 हजार ४५७ हिट्ससह अमेरिकाच आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ ब्रिटनमधून ५ हजार २४७, हाँगकाँगमधून ४ हजार ७२३, सिंगापूरमधून ३ हजार १११, र्जमनीमधून १ हजार २६१, ऑस्ट्रोलियातून १ हजार १९८ आणि कँनडामधून ९६२ हिट्स पडलेल्या आहेत.
याशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून पन्नासहून अधिक हिट्स पडलेल्या आहेत.
No comments:
Post a Comment