धावडेवस्तीत सहा वर्षांनी पुन्हा थरारनाट्य ; सराईत गुन्हेगार गोट्या धावडे याच्यासह दोघांचा खून
www.mpcnews.in
सहा वर्षांपूर्वी झालेल्या पिंपरी-चिंचवडचे भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अॅड.अंकुश लांडगे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या ऊर्फ सचिन कुंडलिक धावडे (वय 35) आणि त्याचा मित्र अंकुश रामदास लकडे (वय 25) याचा आज (गुरुवारी) निर्घूणपणे खून करण्यात आला. दहा ते बारा जणांच्या टोळक्याने गोळीबार करत धारदार शस्त्रास्त्राने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांचा अन्य एक मित्र संदीप मधुरे गंभीर जखमी झाला आहे. भोसरीतील धावडेवस्तीमध्ये दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तणावाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment