निगडीतील आधार केंद्रात बालिका दाखल:
निगडी येथील आधार केंद्रात २५ नोव्हेंबर रोजी पोलिसांमार्फत आणि बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार एक बालिका दाखल झाली आहे. ही बालिका पोलिसांना भोसरीतील संत ज्ञानेश्वर भाजी मंडईत २४ नोव्हेंबरला रात्री सव्वाअकरा वाजता सापडली. या वेळी तिचे अंदाजे वय पाच दिवस होते. आधार केंद्रातील कार्यकर्त्यां ज्योती देव यांनी ही माहिती दिली आहे. ओळखीसाठी या बालिकेचे नाव आर्या ठेवले आहे. तिचा रंग सावळा व चेहरा गोल आहे. या बालिकेच्या आई-वडिलांनी अथवा नातेवाइकांनी 'आधार- प्लॉट क्र. ४७ / ४८, विभाग क्र. २७, जनता वसाहत निगडी, पुणे- ४४' किंवा 'बाल कल्याण समिती- शिवाजीनगर, पुणे- ५' या पत्त्यांवर संपर्क साधावा. ०२०- २७६५६२५७ आणि ०२०- २५५३५३३४ हे दूरध्वनी क्रमांकही संपर्कासाठी उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment